Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भविष्यात लालपरी हायब्रीड इंधनावर धावणार; परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

मुंबई : एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन २०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सीएनजी व एलएनजी सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणा-या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरण पूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

ते म्हणाले, एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणा-या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४% खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे १० लाख ७० हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतात. भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता, पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  “पाकिस्तानने औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा, अन्यथा नामोनिशाण”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

सीएनजी आणि एल. एन. जी. हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेल पेक्षा स्वस्त असून पर्यावरण पूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लीटर ५-५.५ किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एल. एन.जी व सी एन.जी. इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून घेण्यात येणा-या नव्या २० हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणा-या घेण्यात येणार आहेत.

इंधनावर २० टक्के सूट

एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एलएनजी इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या २०% कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. राज्यभरात ९० ठिकाणी एलएनजीचे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सीएनजीचे २० पंप उभारले जात आहेत, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button