breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

१८ वर्षांखालील मुलाने गुन्हा केला तर पालकांवर होणार कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. अशा गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी १८ वर्षाखालील मुलगा गुन्हेगारीत आढळला तर थेट त्याच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी दोन टोळीच्या वादातून एकावर वार करण्यात आले होते. या सर्व प्रकरणानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपीच्या शोधात होते. त्यावेळेस सहापैकी चार विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा उल्लेख करत संजय राऊतांचा खोचक टोला!

या गुन्ह्यामध्ये असणारे दोन विधी संघर्षित बालकांवर मागील ३०२ मध्ये गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी यांच्या राहत्या घरी तपास करत दोन तलवारी, तीन कोयते, एक चॉपर असा ऐवज पोलिसांना आढळून आला आहे. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये विधी संघर्षित बालकाच्या वडिलांना घरात विनापरवाना हत्यारे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button