breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

श्रीरामपूरमधील पती-पत्नीचा बंधाऱ्यात वाहून गेल्याने मृत्यू

नगर |

श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी शिवारात जाधव वस्तीनजीक बंधाऱ्यात पाय घसरून तोल जाऊन पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीसह पत्नीचाही पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की माळेवाडीच्या पश्चिमेस जाधव वस्तीनजीकच्या ओढय़ास चार दिवसांपासून पूर आलेला आहे. आदिवासी कुटुंबांतील मंजाबापू गायकवाड व पत्नी चंद्रकला गायकवाड नेहमी शेतातील मजूर काम नसल्यावर सरपन काडी आणण्यासाठी अथवा ओढय़ास पाणी आल्यावर मासे शोधण्यासाठी जात असत. आज या बंधाऱ्यावर ते मासे शोधण्यासाठी गेले असावेत. प्रथम पत्नी चंद्रकला तोल जाऊन बंधाऱ्यात पडल्याने पोहता येत असलेल्या पतीने उडी टाकून तिला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पाण्याच्या भोवऱ्यात अथवा काटवनात गुंतल्याने वरती आला नाही.

गोंधवणी खैरी निमगांव परिसरातून ओढय़ाचा उगम होतो. पुढे छोटे नाले मिळत असल्याने व उतार असल्याने कायम पाण्याचा प्रवाहाचा जोर असतो. माळेवाडी पासून पुढे महाकळवाडगांव खानापूर शिवारातून हा ओढा भामाठाण गावाजवळ गोदावरीला मिळतो. याच ओढय़ात पूर्वी मळीचे पाणी सोडण्यात येत असे त्यामुळे खानापूर भामाठान, परिसरात गिरनाई नाला या नावाने ओढय़ास ओळखतात. गेली दोन दिवसांत परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने खड्डे खूप असल्याने हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय ४०) प्रवाहात बुडाली. तिला वाचविताना पती मंजाबापू गायकवाड (वय ४५) यांच्या अकस्मात मृत्यूची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, माळवाडगांव,भोकर येथील नवरात्र उत्सवाची बैठक आटोपून तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक तरूण व नातेवाइकांसह शंभरहून अधिक लोक शोधकार्यात सामील झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button