breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : लोणावळ्यातील लोहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी, चार तास अडकून पडले

पुणे : राज्यात सततच्या पावसामुळे पर्यटकांनी गडावर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. लोणावळा परिसरात असलेल्या लोहगडावर हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याचं एका व्हिडीओ मधून समोर आलं आहे. अक्षरश: पाऊल ठेवायला देखील जागा नसल्याचं यामध्ये दिसत आहे. तर हिच परिस्थिती खडकवासला, पानशेत, लोणावळा अन् ताम्हिणी भागातही बघायला मिळाली.

पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गड-किल्ले, घाट वाटा, नुकत्याच सुरू झालेल्या धबधब्यांच्या परिसरात पर्यटकांची दिवसभर वर्दळ दिसत आहे. दरवर्षी बघायला मिळतं गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर पोलीस देखील अशा ठिकाणी असणे गरजेचे असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादीनंतर ‘या’ पक्षातही बंडखोरी होणार’; रामदास आठवले यांचे सूचक विधान

https://twitter.com/pulse_pune/status/1675779123090710529

लोणावळ आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुले लोणावळा आणि मावळ परिसरातील छोटे-मोठे धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, मुंबई, पुण्यातील पर्यटक प्रेमिंनी लोणावळा, खंडाळा, लोहगड, भाजे या ठिकाणी आल्याचे बघायला मिळत आहे. लोहगडावर प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटक तब्बल चार तास अडकून बसले होते. असेच चित्र इतर ठिकाणीही पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button