15 ऑगस्टपासून हॉटेल, मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
![Hotels, malls allowed to continue until 10pm from 15 August](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Rajesh-Tope-3-1-1.jpg)
मुंबई – राज्यभरातील हॉटेल, रेस्टाॅरंट तसेच मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. त्यात निर्बंध कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत, त्या संदर्भात आता निर्णय झालेला आहे.
Maharashtra Government allows the operations of hotels and restaurants till 10 pm in the state. As of now hotels and restaurants were allowed to operate till 4 pm only. Detailed SoP to be issued shortly.
— ANI (@ANI) August 11, 2021
उपाहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त 200 जणांना परवानगी असेल. हॉलमध्ये जी आसन क्षमता असते त्यात 50 टक्के परवानगी दिली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.