ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

…म्हणून पीएफच्या व्याजदरात केली कपात

अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

पीएफ खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. हा निर्णय योग्यच असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज राज्यसभेत त्या बोलत होत्या. दरम्यान, गतवर्षी पीएफवरील व्याजदर ८.५ टक्के इतका होता. यंदा तो कमी करुन ८.१ टक्के करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. जर या निर्णयावर अर्थ खात्याने शिक्कामोर्तब केले तर देशभरातील जवळपास सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक व्याजाचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, इतर अल्प बचत गुंतवणूक योजनांच्या तुलनेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर अधिक आहे. व्याजदर कपातीचा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या संघटनेच्या विश्वस्तांनी घेतला आहे. हा निर्णय प्राप्त परिस्थितीनुसार घेतला आहे.

पीएफबाबत अर्थमंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे. अल्प बचतीच्या इतर योजनांशी तुलना केली तर पीएफवर आजच्या घडीला चांगले व्याज मिळत आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवरील व्याजदर ७.४ टक्के, पीपीएफवर ७.१ टक्के, एबसीआयच्या ५ आणि १० वर्ष मुदतीच्या ठेवींवर जवळपास ५.५० टक्के व्याज आहे. या सर्व योजनांच्या तुलनेत ईपीएफओने पीएफवर ८.१ टक्के व्याजदर जाहीर केला आहे. मागील ४० वर्षात पीएफ दरात कपात करण्यात आली नव्हती असाही दावा सीतारामन यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button