ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगली : शिव स्वराज्य गणेश मंडळातर्फे ‘‘हळदी-कुंकू’’ समारंभ उत्साहात

सागांव येथील मंडळाचा विधायक उपक्रम : सहभागी महिलांचा भेटवस्तू देवून सन्मान

शिराळा । प्रतिनिधी

सागांव (ता. शिराळा) येथील श्री शिव स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने ‘‘नारी शक्ती सन्मान’’ संकल्पनेतून परिसरातील महिलांसाठी ‘‘हळदी-कुंकू’’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी महिलांना छोटेखानी भेटवस्तुही देण्यात आल्या. या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतूक होत आहे.

महिला सन्मान व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. समारंभास जवळपास १३२ महिला सहभागी झालेल्या होत्या. याबद्दल सर्व महिला माता-भगिनींचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. दीपा ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजन पुढाकार घेतला.
हळदी कुंकू समारंभास सहभागी झालेल्या सर्व १३२ महिलांना मंडळातर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व कार्यक्रमाच्या शेवटी महिलांच्या कडून श्री गणेशाची आरती करण्यात आली.

हेही वाचा – Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताला मिळालं दुसरं गोल्ड मेडल

समाजपयोगी उपक्रमांवर मंडळाचा भर..

सागांव पंचक्रोशीमध्ये सामाजिक उपक्रमांवर भर देणारे मंडळ म्हणून शिव स्वराज्य गणेश मंडळाची ओळख आहे. दीपा ग्रुपच्या पुढाकाराने प्रतिवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. सुमारे २५ हून अधिक वर्षांपासून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, चिंबू चमचा अशा स्पर्धा घेण्यात येत आहेत. चित्रकला स्पर्धा दोन गटांमध्ये झाली. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी महिलांसाठीही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button