मोठा दिलासा ! तीन कोटी रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 97.21 टक्के
पिंपरी चिंचवड | देशात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने निरंतर कमी होत आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी तीन कोटी रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, मोठा दिलासा मिळाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.21 टक्के एवढा झाला आहे.
गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 08 लाख 74 हजार 376 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 14 हजार 713 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 39 हजार 649 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली सध्या 4 लाख 50 हजार 899 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 08 हजार 764 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे.
देशात आजवर 43 कोटी 23 लाख 17 हजार 813 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 32 हजार 343 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 37 कोटी 73 लाख 52 हजार 501 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 12 लाख 35 हजार 287 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.