लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार ?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारकडून ‘ई-केवासी’ बंधनकारक करण्यात आले. यासाठी दोन महिन्यांची मुदतही देण्यात आले. मात्र या योजनेसाठी ई-केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना लाडक्या बहीणींना करावा लागत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे.
या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठेवण्याची शक्यता असून त्यातून नाराजी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. जी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सध्या सरकारने या योजनेतील ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे.
हेही वाचा – सूनबाई अपघात प्रकरणात अडकल्या म्हणून..; ‘मी मोदीभक्त’ म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर ठाकरे गटाची जहरी टीका
दुसरीकड, सरकारकडून या योजनेच्या लाभार्थींची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. आता ‘ई-केवायसी’तून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचा शोध घेतला जाणार आहे.




