breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमराठवाडामहाराष्ट्र

नाना पटोलेंसह तुमच्या लोकांना सल्ले द्या; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पण त्याचसोबत त्यांनी त्यांच्याही लोकांना सल्ले दिले पाहिजेत. आणि थोडा अधिकचा सल्ला नाना पटोलेंनाही दिला पाहिजे असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठया प्रमाणावर घडामोडी घडल्या. शिवसेनेत बंडखोरी केल्यांनतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झाली. अशातच 5 ऑक्टोबरला दसऱ्या दिवशी दोन्ही गट मेळावा घेणार आहेत. दोन्ही गटांकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुद्धा सुरु आहे. दसरा मेळाव्याची चढाओढ सुद्धा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गटांना टीका करताना मर्यादा पाळा असा सल्ला दिला आहे. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान काल म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी नंतर देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस म्हणाले, ”शरद पवार असे सल्ले देत आहेत ते चांगलच आहे आणि त्यांनी असे सल्ले देत राहिले पाहिजेत. पण त्याचसोबत त्यांनी त्यांच्याही लोकांना सल्ले दिले पाहिजेत. आणि थोडा अधिकचा सल्ला नाना पटोलेंनाही (nana patole) दिला पाहिजे असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.

दरम्यान भाजपचे (bjp) सार्वधिक निर्णय घेतात या टीकेला सुद्धा फडणवीस चोख उत्तर देत म्हणाले, ”निर्णय भाजप घेतंय की शिवसेना घेतंय हे महत्वाचं नाही तर हे निर्णय शासन घेत आहे. मंत्रिमंडळात कोणताही विषय जेव्हा निर्णयासाठी येतो तेव्हा तो विषय राज्याचे मुख्यमंत्री मांडत असतात. आणि मग त्याला कॅबिनेट मान्यता देते. पण विरोधकांना निर्णय घेण्याची सवयच नव्हती पण आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button