जनरल मोटर्स कामगार संघटनेचे आता मुंडन आंदोलन
जनरल मोटर्स कामगारांचा दसरा रस्त्यावर आता दिवाळी तरी घरातून साजरी होणार का
![Now Mundan Andolan of General Motors Labor Union](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/mundan-andolan-780x470.jpg)
जनरल मोटर्सचे उर्वरित कामगार हुंडाई मोटर्सकडे हस्तांतरित करण्यासाठी शासन स्तरावर कोणतीही कारवाई नाही
वडगाव मावळः वडगाव मावळ जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्या कडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जनरल मोटर्स कामगार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषणाला 33 दिवस उलटूनही शासनाने कोणताच तोडगा काढलेला नाही. परिणामी आता जनरल मोटर्स कामगार संघटनेचे मुंडन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. इथून पुढं ही चालूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून उदरनिर्वासाठी तळेगाव दाभाडे या ठिकाणी स्थलांतरित झालेले जनरल मोटर्सचे कामगार साखळी उपोषणा ३३ दिवसांपासून कुंटूंबासह सनदरशील मार्गाने करत असुन शासनाने आजतागायत आमचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे आज दि. 3 नोव्हेंबरपासून शासनाचा निषेध म्हणून साखळी उपोषण चालूच ठेवून आज पासून मुंडन आंदोलन सुरू केले आहे.
कामगार मंत्री व कामगार विभाग यांचा निषेध
हे मुंडन आंदोलन तसेच साखळी उपोषण इथून पुढं ही चालूच राहील. आजतागायत सरकारने जनरल मोटर्सचे उर्वरित कामगार हुंडाई मोटर्सकडे हस्तांतरित करण्यासाठी शासन स्तरावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे हे आंदोलक आक्रमक झाले असून, कामगार मंत्री व कामगार विभाग यांचा निषेध करत आहेत.