breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ
चंद्रपुरात जनरेटरमध्ये गॅसगळती; गुदमरून कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
चंद्रपूर – चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर भागात एका घरामध्ये रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने डिझेलवरील जनरेटर संच लावला. मात्र जनरेटरमधून गॅसगळती झाल्याने धुरामुळे श्वास गुदमरून कुटुंबातील ७ जणांपैकी तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. दुर्दैवाची बाब अशी की, दहा दिवसांपूर्वीच या घरात विवाह समारंभ पार पडला होता.
दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मधील ही घटना असून मृत्यू पावलेले सर्व मजूर वर्गातील सदस्य आहेत. या सर्व मृतांची नावे – रमेश लष्करे (४०), अजय लष्करे (२०) लखन लष्करे (९), कृष्णा लष्करे (८), माधुरी लष्करे (१८), पूजा लष्करे (१४) अशी आहेत. तर दासू लष्करे (४०) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वजण सकाळी बेशुध्द अवस्थेत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.