गणेशोत्सव 2023 ः गणेशोत्सवानिमित्त एक्झर्बिया अॅबोड, जांभुळ सोसायटीच्यावतीने विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन
लहान मुले, महिला, तसेच युवकांसाठी विविध स्पर्धा, सर्व गटांसाठी विविध खेळ, स्पर्धांची रेलचेल
![Ganeshotsav 2023, On the occasion of Ganeshotsav, Exerbia Abode, Jambhul, Society, Bahardar, Program, Organisation,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/10x11-01-780x470.jpg)
वडगाव-मावळ, (पुणे) : ढोल ताशाच्या गजरात, जल्लोषात यंदाही त्याच उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षी प्रत्येक उत्सव मंडळे काहीतरी आगळे वेगळे करत आहे. त्यामुळे गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे. श्रीगणेशमूर्ती घरात आल्यावर आपल्या घरात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण होते. घरात प्रसन्नता निर्माण होते. आप्तेष्ट मित्र यांच्या भेटी झाल्याने आनंद द्विगुणित होत असतो. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा, ज्ञानाचा अधिपती बाप्पा गणराजाचे मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे थाटामाटात आगमन होत आहे. या निमित्त मावळ तालुक्यातील वडगाव जांभुळ येथील एक्सर्बिया अॅबोड या सोसायटीच्या गणेशोत्सवाला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचे कारण म्हणजे गणेशोत्सवानिमित्त एक्झर्बिया अॅबोड, जांभुळ सोसायटीच्या वतीने 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जी 2 इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात मनोरंजनाचे खास कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, सचिव दिनेश सकट यांनी महाईन्यूजला दिली. तसेच सोसायटीच्या सर्व रहिवाशांनी या उत्सवात कोणताही मनभेद, मतभेद न करता सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष शिरोडकर यांनी केले आहे.
एक्सर्बिया अबोडच्या गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाची रुपरेषा
दररोज बाप्पांची आरती सकाळी 9 तर सायंकाळी 8 वाजता होईल.
मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान, बाप्पांच्या आगमनानिमित्त मिरवणूक, स्थापना व आरती कार्यक्रम
बुधवार, 20 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमीनिमित्त सायंकाळी 8.30 ते 10 दरम्यान, सुस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम
गुरवार, 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8.30 ते 10 दरम्यान, लहानग्यांसाठी लिंबू चमचा खेळाचे आयोजन
शुक्रवार, 22 सप्टेंबर रोजी लहानग्यांसाठी सायंकाळी 8.30 ते 10 दरम्यान, गोणी उडी, यांमध्ये लहान तसेच मोठा गटही सहभागी होऊ शकणार आहे.
शनिवार, 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8.30 ते 10 दरम्यान, सर्व गटांसाठी बकेट बॉल स्पर्धा
रविवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत सर्व गटांसाठी नृत्य स्पर्धा
सोमवार, 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 11 दरम्यान, लहानग्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सर्व गटांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत सर्व गटांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंत बक्षीस वितरण समारंभ
गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 4 ते 8 गणपती विसर्जन मिरवणूक, तर रात्री 8 ते 10 महाप्रसाद
सोसायटीमधील रहिवाशांनी जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन मंडळाच्या कार्यकारिणी कमिटीने केले आहे.