breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना ५ वर्ष मोफत वीज, शासनाने काढला जीआर; जाणून घ्या माहिती

Farmers Free Electricity | शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासंदर्भातील जीआर शासनाने काढला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार जे शेतकरी ७.५ एचपी म्हणजे अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.

४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं जीआरमध्ये सांगण्यात आलं आहे. जे शेतकरी ७.५ एचपीपर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळणार आहे.

हेही वाचा      –      कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना 

७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोफत वीज मिळणार आहे. पण ७.५ एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बील भरावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button