ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
गुंतवणूकीच्या बहाण्याने महिलेची २७ लाखांची फसवणूक
पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल
![Fraud of 27 lakhs of a woman on the pretext of investment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Fraud-780x470.jpg)
पिंपरी : गुंतवणूकीच्या बहाण्याने महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार १४ डिसेंबर २०२३ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत पिंपरी येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी महिलेने बुधवारी (३ एप्रिल) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मार्लिना, शाम कपूर, व विविध बँक अकाऊंट धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये सामावून घेतले. तेथे त्यांना गुंतवणुकीबद्दल सांगितले. यावेळी जास्त परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीला २७ लाख ३२ हजार २० रुपये भरायला सांगितले व फिर्यादीला कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे, पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.