ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र
अजून चार पेन ड्राईव्ह येणार; दानवेंचा गौप्यस्फोट…
![Four more pen drives will come; Demon blast ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220108-WA0005-1.jpg)
जळगाव | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे. अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तिकडून एखादा आरोप झाला की आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
पेन ड्राईव्हमध्ये सत्यता नव्हती तर मग ऍड प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, पेनड्राईव्हमध्ये सत्यता आहे, म्हणूनच त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे. त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.