विशाल नगरमधील पंचकन्यांनी सर केला ‘केदारकंठ’; नगरसेविका आरती चोधे यांच्याकडून सन्मान
![Five girls from Vishal Nagar performed 'Kedarkanth'; Honored by corporator Aarti Chodhe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/aarti-chondhe-pune-780x470.jpg)
पिंपरी : ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय तिरंगा केदारकंठ शिखरावर दिमाखात फडकविला. 74 व्या भारतीय प्रजासक्ताच्या पूर्व संध्येला समिटवर ७४ ध्वजांची पताका फडकावून भारतमातेला १३ हजार फुटांवरून वंदन केले. पिंपरी-चिंचवड येथील विशाल नगरमधील पाच युवतींनी केदारकंठ सर केले. प्रजासत्ताक दिनी बेस कॅम्प सांक्री येथे राष्ट्रगीत गाऊन देशाला मानवंदना अर्पण केली. या गृपमधील या पंचकन्यांच्या यशस्वितेला साजेसा कौतुक सोहळा नगरसेविका आरती चोंधे यांनी आयोजित केला.
विशाल नगरमधील नितू करंजुले, शुभांगी भोकरे, पूजा खोत, वर्षा गुंजाळ, सरिता पाटील या पाच युवतींनी केदारकंठ शिखर यशस्वीपणे सर केले. त्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी यशश्री महिला संस्थेच्या सविता इंगवले, कुंदा पाटे, उज्वला पोवार, अर्चना पवार, सुवर्णा गाडे, योगिता जाधव, स्मिता कुलकर्णी, संध्या निखळ, अलका मकवाना, वेदवंती उपाध्याय, सुलभा गराडे, स्नेहल देसले आदी उपास्थित होत्या.
केदारकांटा समिटच्या सर्व २३ जणांनी केदरकांटा वर यशस्वी आरोहण केले. या ठिकाणचे वैशिष्ट म्हणजे १७ वर्षापासून ७० वर्षापर्यंत, त्यात १० महिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उणे १० ते १५ तापमान, बर्फ वर्षाव असताना हे शिखर सर करत यश संपादन केले. आरतीताई नेहमीच सर्वांना प्रोत्साहन देत असतात. अशा भावना या युवतींनी व्यक्त केल्या.