अखेर बाईक टॅक्सी बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश
![Finally, the court order to stop the bike taxis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/BABA-KAMBLE-2-780x470.jpg)
- रिक्षा चालक-मालकांच्या न्यायालयीन लढ्याला यश
मुंबई ः शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सीवर बंदी घालण्याच्या प्रमुख मागणीसाठी शहरातील रिक्षा संघटनांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढून बंद पुकारला होता.बाईट टॅक्सी कायमस्वरुपी बंद व्हावे यासाठी हा लढा उभारण्यात आला होता. यानंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे रिक्षा फेडरेशनने न्यायालयमध्ये बाजू मांडल्याने ही लढाई न्यायप्रविष्ट होती. अखेर आज बाईक टॅक्सी बंद करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्याने रिक्षा चालक-मालकांच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळाले.
या निर्णयाचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष कष्टकरांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले. आपल्या सर्व सहकार्यांसोबत ते आज ते आज न्यायालयांमध्ये उपस्थित होते. यावेळी बाबा कांबळे म्हणाले आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकली. पुण्यामध्ये रिक्षा बंद सारखे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर आता न्यायालयीन लढाई देखील आम्ही जिंकली. खरे तर हा रिक्षा चालक-मालकांचा विजय आहे. शेवटी न्याय मिळाला आम्ही न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो.
पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय ढवळे सर्वसामान्य रिक्षा चालक आप्पा हिरेमठ, संतोष नेवासकर, सचिन रसाळ आधी रिक्षा चालकदेखील मोठ्या संख्येने न्यायालयामध्ये उपस्थित होते.