भीषणः पुण्यातील मार्केटयार्डात आग, हॉटेलच्या पोटमाळ्यावरील कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
![Fierce, Marketyard in Pune, Fierce fire, On the attic of the hotel, Workers were killed, Two died, Pune, Pune News, news, Marathi news,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/pune-market-yard-Fire-780x470.png)
पुणे: पुण्यातील मार्केट यार्ड मधील हॉटेल रेवळसिद्धला काल रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन कामगार होरपळले आहेत. त्यातील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून, एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामगार हॉटेलच्या पोटमाळ्यावर झोपले असल्याने त्यांना कुठलीही हालचाल करता आली नाही. हा जाग्यावरच बेशुद्ध अवस्थेत पोट माळ्यावर पडला होता. दोन कर्मचारी यांनी मदतीसाठी आरडाओरडा करत होते. मात्र, काही वेळात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मुना मोतीलाल रथोर (वय, ३७ रा, नानादे,) संदीप (पूर्ण माहिती नाही). अशी या मृत झालेल्या व्यक्तीची नावे आहेत, तर शशिकांत सोनबा गळपा, (वय २८, रा. सोलापूर) असं जखमी झालेल्या कामगाराचं नाव आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे मार्केटयार्ड परिसरात धांदल उडाली . या हॉटेलच्या आजूबाजूला अजून दोन हॉटेल आहेत. मसुमारास लागलेल्या आगीमुळे कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी जोर जोरात आरडा ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकूण कार्यरत असलेल्या सिक्युरिटी गार्ड्सने त्वरित शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शटर आतल्या बाजूने लॉक असल्या कारणाने आणि आगीमुळे शटर गरम झाल्यामुळे उघडताना अडचणी येत होत्या. सिक्युरिटी गार्डने त्वरित अग्निशमन दलाला संपर्क केला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत सिक्युरिटी गार्डने शटर उघडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. दुर्देवाने त्यांना वाचवण्याचा कोणताही मार्ग निघू शकला नाही.
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले की, सदर ठिकाणी दोन मजले असणाऱ्या इमारतीतील हॉटेलमध्ये आग लागली होती. शटर आतमधून कुलूपाने बंद असल्याने 3 कामगार पोटमाळ्यावर अडकले होते. जवानांनी तातडीने बोल्डकटर या अग्निशमन उपकरणाने शटर तोडून बी ए सेट परिधान करत पोटमाळ्यावर प्रवेश केला आणि आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवला. अडकलेल्या 3 कामगारांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत तत्परतेने बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ मधून ससून रुग्णालयात रवाना केले. जवानांना आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली व मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. या ठिकाणचे चार सिलेंडर बाहेर काढण्यात आले.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला.