breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर भीषण अपघात; ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू

अवजड वाहनाला पाठीमागून धडक : पुण्याकडे येणाऱ्या वाहनाचा अपघात

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. यात चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे अपघात झाला होता. त्याच उर्से टोलनाका परिसरात हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास मुंबईवरून पुण्याला ही चारचाकी येत होती. तेव्हा एक अवजड वाहनाच्या चालकाने लघुशंकेसाठी गाडी महामार्गाच्या कडेला पार्क केली. त्याचवेळी मुंबईवरून भरधाव वेगात आलेल्या चारचाकीच्या चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट अवजड वाहनाला मागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की अक्षरशः निम्या गाडीचा चक्काचूर झाला. अन्‌ गाडीतील चार ही प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला. तीन आठवड्यापूर्वी याच परिसरात असाच अपघात झाला होता. तेव्हा तीन प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी चारचाकी थेट ट्रकला धडकली होती. या अपघाताच्या सत्रामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button