TOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
डांगे चौक ते औंध बीआरटी मार्गावर भीषण अपघातः पीएमपीएमएल बसची टेम्पोला धडक, दोन जण जखमी
![Dange Chowk, Aundh BRT, horror on the route, accident, PMPML bus, tempo hit, two injured,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Bus-Accident-780x470.jpg)
पिंपरी : वाकड येथील डांगे चौक ते औंध बीआरटी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पीएमपीएमएल बसने तीन चाकी टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे. वाकड येथील डांगे चौक ते औंध बीआरटी मार्गावरून पीएमपीएमएल बस पहाटेच्या सुमारास जात होती. या दरम्यान तीन चाकी टेम्पोने बीआरटी मार्गावर यु-टर्न घेतला. त्यामुळे भरधाव येणाऱ्या बसची टेम्पोला धडक बसली.
या अपघातात दोन जखमी झाले आहेत. तसेच बसच्या धडकेत टेम्पो पलटी झाला आहे. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.