Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारकडून पैसे खाण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर; विजय वडेट्टीवारांचा यांचा गंभीर आरोप

मुंबई : गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती शेअर केली आहे. जालना जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. तसेच ज्या तलाठ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या तलाठ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळायला हवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

हेही वाचा –  चालकाला झोप आली तर अलार्म वाजणार, एसटीत आता एआय तंत्रज्ञानाच्या स्मार्ट ई-बसेस

सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी पण खायला कमी करणार नाही. जालना जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याची घटना पुढे आली आहे. सरकार आणि प्रशासनात पैसे खाण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर कसा होत आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्या तलाठ्यांनी हा भ्रष्ट्राचार केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या तलाठ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळायला हवा ही आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button