SSC Result | दहावीच्या निकालात सुद्धा कोकणाची बाजी, दहावीचा निकाल ९५.८१ टक्के
SSC Result 2024 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात कोकण विभागाने ९९.०१ टक्क्यांनी बाजी मारली आहे. तुलनेने यंदा नागपूरचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे ९४. ७३ टक्के लागला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते.
हेही वाचा – IPL २०२४ मध्ये कोणता पुरस्कार कोणाला मिळाला?; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले
विभागनिहाय निकाल (टक्केवारी)
- पुणे : 96.44 टक्के
- नागपूर : 94.73 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
- मुंबई : 95.83 टक्के
- कोल्हापूर : 97.45 टक्के
- अमरावती : 95.58 टक्के
- नाशिक : 95.28 टक्के
- लातूर : 95.27 टक्के
- कोकण : 99.01 टक्के
निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स खालीलप्रमाणे
- mahresult.nic.in,
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in
- results.digilocker.gov.in
- results.targetpublications.org