ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

अनाथ मुलांसोबत ‘सोशल हॅन्डस फाउंडेशन’ची दिवाळी साजरी

मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पुणे : देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण दिवाळी म्हणजे दीपोत्सव. मात्र, आजही समाजातील अनेक घटक असे आहेत ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील माऊली अनाथ आश्रमातील मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून सोशल हॅन्डस फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या बहुउद्देशीय संस्थेच्या संकल्पनेतून दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. नेहमीच समाजातल्या तळागाळात जाऊन आनंदाचे क्षण घेऊन पोहोचणाऱ्या या सामाजिक संस्थेने यंदा या अनाथ मुलांची दिवाळी गोड केली आहे.

Smiles on children's faces
Smiles on children’s faces

दिवाळी हा सण गोड व्हावा म्हणून सोशल हॅंड्स दरवर्षी वंचित घटकांसाठी उपक्रम राबवून अनेक लोकांच्या जीवनातील तिमिराला प्रकाशाची वाट दिली आहे. याही वर्षी वायफळ खर्च न करता सोशल हॅन्डस फाउंडेशन सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विविध कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी पार पाडले. यासाठी संस्थेने प्रमुख पाहुणे म्हणून भवताल संस्थेचे संस्थापक, पर्यावरण तज्ञ अभिजीत घोरपडे यांना आमंत्रीत केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या आश्रमातील मुलांनी स्वागत गीत सादर करून सोशल हॅन्डस फाउंडेशन मधील सर्व पदाधिकाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्याचबरोबर आईवर कवीता, तबला वादन, माहितीपर भाषण देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. यानंतर सोशल हॅन्डस फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने विविध फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध खेळांचे साहित्य गिफ्ट म्हणून देण्यात आले.

Smiles on children's faces
Smiles on children’s faces

यावेळी भवताल संस्थेचे संस्थापक, पर्यावरण तज्ञ अभिजीत घोरपडे, ओझर्डे इंस्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन संस्थेचे डायरेक्टर प्रा. भूषण ओझर्डे, ‘माऊली अनाथ आश्रम’चे संस्थापक अध्यक्ष प्रेममूर्ती नवनाथ लिम्हन महाराज, अद्वैत मीडिया संस्थेचे डायरेक्टर नितिन येलमार, सोशल हॅन्डस फाउंडेशनचे संस्थापक मदन दळे, सचिव सचिन अडागळे, अशोक एडगे, राज गोंगडे आदि मान्यवर उपस्थित होते.

अभिजीत घोरपडे यांनी मुलांमध्ये सोबत गप्पागोष्टी करत, अभ्यास करून पुढे जा अशी सूचना करतानाच चांगले लोक सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दिवाळीच्या आनंदात अनाथांना सामावून घेण्यासाठी सोशल हॅन्डस फाउंडेशन संस्थेच्या पुढाकाराचे कौतुक केले.

या मुलांना शैक्षणिक हातभार लाभावा म्हणून सोशल हॅन्डस फाउंडेशन संस्थेचे सल्लागार प्रा. भूषण ओझर्डे त्यांच्या ओझर्डे इंस्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन या संस्थेमध्ये मोफत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले. शैक्षणिक साहित्य वाटप देखील करण्यात आलं. तसेच सर्वांनी एकत्र येत यावेळी अनेक खेळ खेळले गेले.

यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाल्याचं बघायला मिळालं, अशी प्रतिकिया माऊली अनाथ आश्रमचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ लीम्हन महाराज यांनी यावेळी दिली.

आमच्या आई वडिलांचे छत्र हरपलं तेव्हापासून आम्ही या ठिकाणीच राहतो. दिवाळीनिमित्ताने सोशल हॅन्डस फाउंडेशन संस्थेचेच्या वतीने आमच्या जीवनातील दिवाळी प्रकाशमय व्हावी. म्हणून करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button