वायसीएम रुग्णालयात जागतिक रेडिओलॉजी दिनानिमित्त रुग्णांना फळे वाटप
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला
![Distribution of fruits to patients on the occasion of World Radiology Day at YCM Hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/YCM-780x470.jpg)
पिंपरी:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जागतिक रेडिओलॉजी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त क्ष किरण विभागात केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला. तसेच रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना फळे वाटप करुन सामाजिक भान जपण्याचे काम कर्मचार्यांनी केले.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच विभाग प्रमुख डॉ. रसिका वाघमारे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील क्ष किरण विभागातील सर्व डॉक्टर्स व क्ष किरण तंत्रज्ज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.
8 नोव्हेंबर 1895 रोजी क्ष किरणांचा शोध डॉ. विल्हेल्म कोनरॅड रॉन्टजेन यांनी लावला. हा दिवस जागतिक रेडिओलॉजी दिवस म्हणून साजरा केला जातो. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची मोठी गर्दी होते. क्ष किरण विभागात येणारी संख्याही मोठी आहे. त्यांची गैरसोय होऊ न देता त्यांना योग्य प्रकारे सुविधा देण्यासाठी प्रत्येक कर्मचारी तत्पर राहत आहे. रुग्णसेवेच्या अखंडतेची शपथ घेऊन रुग्णालयाच्या वतीने हा दिवस उत्साहात साजरा केला अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.