TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

शिष्यवृत्ती परीक्षेत दिशा पवार हिची उल्लेखनीय कामगिरी

हवेली तालुक्यात तृतीय क्रमांक : माता अमृतामय विद्यालयाच्या विद्यार्थीनीचे यश

पिंपरी : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेमध्ये निगडी येथील माता अमृतामय विद्यालयातील इयत्ता आठवीतील कु. दिशा बबन पवार विद्यार्थ्यांनीने नेत्रदीपक यश मिळवत याही वर्षी हवेली तालुक्यातील ‘मेरिट लिस्ट’मध्ये तृतीय नंबर मिळविला.

‘इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. कोविड १९ नंतर ऑनलाईन क्लास करत दिशा पवार यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा दिली. एकूण ३०० पैकी २५५ गुण असे ८५.२३ टक्के गुण मिळवले. तिला पुणे जिल्ह्यात ३६ वा क्रमांक तर हवेली तालुक्यात तिसरा नंबर मिळाला आहे.

विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे व कष्टाचे चीज झाल्याचे वर्ग शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले. भावी काळात विद्यालयातील अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी होतील आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपला, आपल्या पालकांचा आणि विद्यालयाचा नावलौकिक वाढवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button