Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

नागपूर | गावपातळीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डी या मैदानी खेळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या बळावर सर्वाधिक विजेतेपद मिळविले आहे. यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सहभाग अधिक असल्याने स्वाभाविकच आम्हाला याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्व. रतन टाटा परिरसर, लक्ष्यवेध मैदान, नरेंद्र नगर येथे आयोजित ‘मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धे’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, आमदार प्रवीण दटके, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, गिरीषजी व्यास, संदीप जोशी, अविनाश ठाकरे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चांगल्या खेळाडूंना घडविण्यासाठी विविध स्पर्धांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असते. प्रत्येक खेळाडूला आपले कसब पणाला लावण्याची, खेळाच्या प्रदर्शनातून नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी यातून मिळते. क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. पुण्याच्या पाठोपाठ नागपूर येथील मानकापूर क्रिडा संकुलात जागतिक पातळीवरच्या क्रीडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा  :  शिवरायांचा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे; अजित पवारांनी गृहमंत्र्यांचे कान टोचले

कबड्डीसारख्या मैदानी खेळाला प्रो कबड्डी लीग स्पर्धा व इतर स्पर्धांनी सर्व स्तरात पोहोचून कबड्डीपटूना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. नागपूर येथील ही अखिल भारतीय पातळीवरची मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. इथे प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवित ही स्पर्धा यशस्वी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

क्रिकेटच्या या वातावरणात आपल्या देशी असलेल्या कबड्डी खेळासाठी नागपूर येथे एवढा भव्य उत्साह व भव्य आयोजन नागपूरातून यशस्वी होऊ शकते हे नागपूरचे यश व वेगळेपण असल्याचे प्रतिपादन अभिनेते स्वप्नील जोशी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या देशी मैदानी खेळासाठी सदैव तत्पर असतात, याला प्रोत्साहन देतात हे अधिक महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे ८ शाळांमध्ये क्रिंडागण विकसित करण्यात येत आहे. प्रतापनगर येथे टेबल टेनिस, एक्सलन्स सेंटर उभारण्यात येत असून दिव्यांगणानाही क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. याचबरोबर रामनगर येथील मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉन टेनिस कोर्ट साकारले जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button