शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त! १५ ऑगस्टपासून भरती प्रक्रिया सुरू
![Deepak Kesarkar said that the education recruitment process has started in the state from August 15](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Deepak-Kesarkar-780x470.jpg)
मुंबई : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात १५ ऑगस्टपासून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सभागृहात म्हटलं आहे.
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात १५ ऑगस्टपासून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.
हेही वाचा – आत्तापर्यंत २००० च्या ‘इतक्या’ नोटा जमा झाल्या, सरकारची संसदेत माहीती
गेल्या वर्षभरामध्ये शालेय शिक्षण विभागाने वेगवेगळे निर्णय घेतले. त्यातूनही काही प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात विधिमंडळात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. याव्यतिरिक्त इतर सर्व प्रश्न आणि मागण्या लिखित स्वरुपात द्याव्यात अशी त्यांना विनंती केली. सदर प्रश्नांच्या संदर्भात अधिवेशन… pic.twitter.com/4lErbyAMb9
— Deepak Kesarkar (@dvkesarkar) July 26, 2023
राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र प्रमालीद्वारे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होत आहे. तथापि, मा. न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतरीम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरतीसंदर्भात कार्यवाही करणे सद्य: स्थितीत शक्य नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.