breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून मारहाण

पुणे : मावळ तालुक्यातील अंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याप्रकरणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याचंही समोर आलं आहे. अलेक्झांडर कोट्स असे या प्राचार्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ जुलै रोजी ही घटना घडली. पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणी शाळेकडून तक्रार आली आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. शाळेतील मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यावर पालकांनी त्याचा जाब शालेय प्रशासनाला विचारला.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम! म्हणाले..

https://twitter.com/rightwingchora/status/1676562894589403137

दरम्यान, प्राचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button