कस्टम विभागाने केला सोने आणि हिऱ्याचा साठा जप्त
सुमारे 1.58 कोटी रुपये किमतीचे सोने तसेच 1.54 कोटी रुपये किमतीचे हिरे मुद्देमाल जप्त
![Customs, Department, Gold, Stock, Confiscation, about, crores, rupees, price, diamonds, goods,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/sona-and-here-780x470.jpg)
मुंबई : मुंबईत कस्टम विभागाने धडाकेबाज कारवाई केली. तीन प्रवाशांनी कपड्याच्या आतून केलेली सोने आणि हिऱ्याची तस्करी हाणून पाडली. 20 आणि 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुंबईतील विमानतळ आयुक्तालय झोन-III ने दोन प्रकरणांमध्ये सुमारे 1.58 कोटी रुपये किमतीचे 2.286 किलो वजनाचे सोने तसेच 1.54 कोटी रुपये किमतीचे हिरे जप्त केले. या कारवाईत एकूण 3.12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कस्टम विभागाने 3 प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या.
बनाव झाला उघड
हे तीन प्रवाशी मुंबई विमानतळावर उतरले. त्यांनी बनियनच्या आत एक विशेष पोकळी तयार केली होती. तर एका प्रवाशाने परिधान केलेल्या ट्राउझर्सच्या पट्ट्याजवळ असलेल्या एका विशेष पोकळी तयार हा माल शरीरात लपवून भारतात आणला होता. पहिल्या प्रकरणात दुबईहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाला अडवण्यात आले. त्याच्या झडतीत हा प्रकार समोर आला. अधिकाऱ्यांनी त्याच्या ताब्यातून 1,400 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाराचे 12 नग सापडले. ज्याची बाजारातील किंमत 97,00,236 रुपये इतकी आहे. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान प्रवाशाने सांगितले की तस्करीचा माल त्याच फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून आणला होता आणि यानंतर अन्य प्रवाशालाही अटक करण्यात आली. दुसऱ्या प्रकरणात हाँगकाँगहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाला रोखण्यात आले आणि त्याच्याकडून 886 ग्रॅम निव्वळ वजनाचे दोन कच्च्या सोन्याचे कडा ज्यांची किम्मत 61,38,864 रुपये आहे. त्याचबरोबर एक 13,70,520 रुपये किंमतीचे रोलेक्स घड्याळ आणि कापलेले लूज नैसर्गिक हिरे जप्त करण्यात आले.त्याच्याकडून 1,54,18,575 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून प्रवाशाने घड्याळ आणि कडा परिधान केले होते तर हिरे त्याच्या बनियानच्या आत एका विशिष्ट पोकळीत लपवले होते.
गेल्या महिन्यात पण मोठी कारवाई
मुंबईत महलूस गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईत मोठे घबाड मिळाले होते. या कारवाईत 17 कोटींचे सोने जप्त करण्यात आले होते. या कारवाईत दोन महिला आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींकडून 23 किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. बाजारातील किंमत सुमारे 17 कोटींच्या घरात आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली होती.