अकोल्यात जमावबंदी लागू; रॅली, मोर्चा, आंदोलनाला बंदी!
![3 lakh 6 thousand 64 new corona in the last 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/corona-virus-5008977_202009491941-e1630296545817.jpg)
अकोला – कोरोना विषाणूची नवीन प्रजाती ‘ओमिक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ‘ओमिक्रॉन’ संसर्गाचा अकोला जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ अन्वये आज रविवार ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरोरा यांनी ४ डिसेंबर रोजी जारी केला.
अकोला जिल्ह्यातील जमावबंदीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इत्यादींचे आयोजन करता येणार नाही, तसेच जमावबंदीच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम नियमित सुरू राहणार असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.