breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

COVID 19 : उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील बाथरुममध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण मृतावस्थेत

उस्मानाबाद | महाईन्यूज| प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा बाथरुममध्ये मृत्यू झाला आहे. मात्र, नेमका कोणत्या कारणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला हे समजू शकले नाही. बाथरुममध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विकासनगर भागातील एकाला कोरोनाची लक्षणे आढळली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी रुग्ण बाथरुममध्ये गेला. मात्र, बराच वेळ तो परत आला नाही. हे निदर्शनास आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत संबंधितास आवाज दिला; परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाला माहिती देण्यात आली.

अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. रुग्ण खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मात्र, नेमका कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला, याचा उलगडा होउ शकला नाही. कोरोना वॉर्डातील रुग्ण असल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. या रुग्णाचा अहवाल आज येणे अपेक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

यापूर्वी ही कोरोना वॉर्डात उपचार सुरु असलेल्या संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दोघांचाही मृत्यू कोरोनाने नव्हे, तर अन्य आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही अन्य आजाराने त्रस्त होते. दरम्यान, मृतावस्थेत आढळलेल्या रुग्णाच्या स्वबचा अहवालही आज रात्रीपर्यंत मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button