#Coronolockdown:“केंद्राच्या सूचना असल्या तरी घाई करु नका”, आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200505_132810.jpg)
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून सोमवारी अनेक ठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी मद्यविक्री दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. मद्यविक्री सुरु झाल्याने रखडलेल्या अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यात परिस्थितीनुसार मद्यविक्री दुकाने सुरु केली जावीत असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने आशिष शेलार यांनी हा सल्ला दिला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार, पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम!”.