breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

CORONA#YCMH : आयसोलेशन विभागातील कर्मचा-यांची सुरक्षा ‘रामभरोसे’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जगातील बहुतांश देशांनी करोना व्हायरची दहशत खालेल्ली असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे. करोनाग्रस्त रुग्णांना ठेवण्यात आलेल्या आयसोलेशन विभागातील नर्सच्या सुरक्षेची तीळमात्र खबरदारी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

केवळ मास्क तोंडाला लावून ही परिचारिका या विभागात शुश्रूषा करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या नर्सला करोनाची बाधा पोचल्यास या विषारी व्हायरसचा फैलाव होऊन वायसीएममधील अन्य कर्मचा-यांचे आयुष्य धोक्यात येणार आहे. याला पालिकेच्या वैद्यकीय विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात तब्बल 8 करोणाग्रस्त आहेत. त्यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असताना वायसीएम रुग्णालय प्रशासनाने सुरक्षेकडे जाणिपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या कक्षामध्ये करोनागृस्तांची शुश्रूशा करणा-या परिचारिकेला सुरक्षिततेसाठी केवळ एक मास्क देण्यात आलेला आहे.

या विषाणुची बाधा झालेल्या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर वैद्यकीय नियमानुसार सुरक्षितेच्या दृष्टीने उत्तम दर्जाची साधणे वापरतात. मात्र, नर्सच्याबाबतीत कोणतीच काळजी घेतली गेली नाही. डॉक्टर या कक्षात उपचार पुरवत नसून त्यांच्या सल्ल्यानुसार नर्स आणि कंपाऊंडर हेच उपचार पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यातील एखादा रुग्ण दगावल्यास त्याला डॉक्टरांना जबाबदार धरावे का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button