#CoronaVirus: ‘१५ रुग्ण करोनामुक्त’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-6-Reuters-1.jpg)
क रो ना चा कहर
करोनाबाधीत रुग्णांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा ही समाधानाची बाब आहे. राज्यात आतापर्यंत करोनाचे १०७ रुग्ण आढळले. त्यातील १५ जण करोनामुक्त झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी जाहीर केले.
टोपे यांनी मंगळवारी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जनतेशी संवाद साधला. करोनाच्या रुग्णांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. करोनाच्या आणखी एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात करोनाबळींची संख्या तीन झाली आहे, असे टोपे यांनी सांगितले. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. ही गंभीर बाब असून, राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरूवात करोनावर मात करण्याच्या दृढ निश्चयाने करा, या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा, असे आवाहन टोपे यांनी केले.