breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२१

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची १२१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात चाकरमानी येत असून आतापर्यंत ७८ हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यात बाधित रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण २ हजार ५६४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी २ हजार ४५३ तपासणी अहवाल प्राप्त  झाले आहेत. त्यातील १२१ अहवाल पॉझिटीव्ह आले असून उर्वरीत २ हजार ३३२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून १११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १२१ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, ४५रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत.

आरोग्य यंत्रणेमार्फत  ५ हजार ८३३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १२१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १७ रुग्ण उपचारानंतर तंदुरुस्त झाले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मेपासून  एकूण ७८ हजार व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button