breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: लक्षणे असलेल्यांचीच चाचणी करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय
एकीकडे मर्यादित चाचणी, विलगीकरण क्षमता आणि दुसरीकडे वाढत जाणारा मृत्यूचा आकडा यावर मात करण्यासाठी आता करोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच करोना चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लक्षणे नसलेल्यांना अलग राहण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी नवी नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे.