Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर- आरोग्यमंत्री राजेश टोपे
![#Covid-19: निर्बंधांचं पालन केलं नाही तर…; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा महाराष्ट्रातील जनतेला इशारा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rajesh-Tope-4-1.jpg)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दररोज दोन ते तीन हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत चालले आहेत. राज्यात आज (17 जून) दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 50.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत. तर 51 हजार 921 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.