breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

#CoronaVirus: ‘या’ खासगी लॅबमध्येही करू शकता कोरोनाची चाचणी; पाहा यादी

देशात करोनाचा प्रादुर्भावर वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं करोनाची चाचणी करण्यास खासगी लॅबनाही मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून करोनाच्या चाचणीसाठी १०९ लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त आणखी १२ लॅबना मान्यता देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानंतर देशातील लॅबची संख्या १२१ होणार आहे. देशातील लोकसंख्या पाहता या लॅबची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत सरकारनं खासगी लॅबचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

३५ लॅबमध्ये करता येणार चाचणी
सरकारकडून ३५ खासगी लॅबना करोनाची चाचणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अनेक लॅब आहे. दिल्लीत, ६, गुजरामध्ये४, हरयाणा ३, कर्नाटक २, महाराष्ट्रात ९, ओडिशात १, तामिळनाडूत ४, तेलंगणात ५ आणि पश्चिम बंगालमध्ये एका खासगी लॅबला करोनाची चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी ४ हजार ५०० रूपयांचा खर्च येतो.

ही आहे यादी

महाराष्ट्र

सबर्बन डायग्नोस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी पश्चिम, मुंबई

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, कोहिनूर मॉल, मुंबई

एसआरएल लिमिटेड, प्राईम स्क्वेअर बिल्डींग, गोरेगाव, मुंबई

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबोरेटरी, चार बंगला, मुंबई

आयजेनेटिक डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी पूर्व, मुंबई

इनफेक्सएन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम

थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेड, तुर्भे एमआयडीसी, नवी मुंबई

सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, रबाळे, नवी मुंबई

ए. जी. डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, नयनतारा बिल्डींग, पुणे


दिल्ली

लाल पथ लॅब, ब्लॉक -ई, सेक्टर १, रोहिणी, दिल्ली

डांग्स लॅब, सी -२ / १, सफदरजंग डेव्हलपमेंट एरिया, नवी दिल्ली

लॅबोरेटरी सर्व्हिसेस, इंद्रप्रस्थ, अपोलो रुग्णालये, सरिता विहार, नवी दिल्ली

मॅक्स लॅब, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, नवी दिल्ली

सर गंगा राम हॉस्पिटल क्लिनिकल लॅब सर्व्हिसेस, सर गंगा राम हॉस्पिटल, दिल्ली

ऑनक्वेस्ट लॅब लिमिटेड, फॅक्टरी रोड, नवी दिल्ली

गुजरात

युनिपथ स्पेशॅलिटी लॅब लिमटेज, १०२, सनोमा प्लाझा, परिमल गार्डनच्या समोर, जेएमसी हाऊस, एलिसब्रिज, अहमदाबाद

सुप्राटेक मायक्रोपॅथ लॅब अँड रिसर्च इन्स्टिट्यूट लिमिटेड, केदार, अहमदाबाद

एसएन जेनलाब प्रायव्हेट लिमिटेड, प्रिसिडेंट प्लाझा -ए, महावीर हॉस्पिटल जवळ, नानपुरा, सूरत

पॅन्जेनॉमिक्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, एलिस ब्रिज, अहमदाबाद


हरयाणा

स्ट्रँड लाइफ सायन्सेस, ए -१७, सेक्टर ३४, गुरुग्राम

एसआरएल लिमिटेड, जीपी २६, सेक्टर १८, गुरुग्राम

मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर-लॅब, ३, ३६३-३६४ , जवाहर नगर. गुरुग्राम


कर्नाटक

न्यूबर्ग आनंद सेफरंस लॅब, आनंद टॉवर, #, ५४, बॉरिंग हॉस्पिटल रोड, बंगळुरू

कॅन्सीट टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, श्री शंकरा रिसर्च सेंटर, बेंगलुरू

ओडिशा

डिपार्टमेंट ऑफ लॅब सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पीस्टल, भुवनेश्वर

तामिळनाडू

क्लिनिकल व्हायरोलॉजी डिपार्टमेंट, सीएमसी, वेल्लोर

डिपार्टमेंट ऑफ लॅब सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लिमिटेड, चेन्नई

न्यूबर्ग एरलिच लॅब प्रायव्हेट लिमिटेड, ४६–४८ मसिलामणि रोड, बालाजी नगर, चेन्नई

श्री रामचंद्र वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्था, पोरूर, चेन्नई


तेलंगण

लॅब सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पीटल्स, ६ वा मजला, हेल्थ स्ट्रिट बिल्डिंग, ज्युबिली हिल्स, हैदराबाद

विजया डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, स्ट्रीट नंबर १, हिमायथ नगर, हैदराबाद

विमटा लॅब लिमिटेड, प्लॉट नंबर १४२, फेज २, आयडीए चेरलापल्ली, हैदराबाद

अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाईल लिमिटेड, डायग्नोस्टिक लेबोरेटरी, बोवेनपल्ली, सिकंदराबाद

डॉ. रेमेडीज लॅब प्रायव्हेट लिमिटेड, ए ३, टायटस प्लाझा, शर्मा कमर्शियल कॉम्प्लेक्स, पुंजगुट्टा

पश्चिम बंगाल

अपोलो ग्लेनिगल हॉस्पिटल, ५८ कॅनल सर्क्युलर रोड, कोलकाता

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button