breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

CoronaVirus : मुंबई-ठाण्यात दोन रूग्ण, राज्यातील रूग्णांची संख्या १२४ वर

मुंबई | महाईन्यूज

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली असून मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 होती.

सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. मुंबईत आणखी 9 जणांना, तर ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

कोरोनाचे रुग्ण ?

मुंबई – 51
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 9
कल्याण – 5
नवी मुंबई – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
ठाणे – 5
सातारा – 2
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1

एकूण 124

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button