breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: मुंबईत ११ रुग्णांचा मृत्यू

चोवीस तासात मुंबईत आणखी २०४ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १११ झाला आहे. तर रुग्णांचा एकूण आकडा १७५३ झाला आहे. २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी २०४ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत १६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात आणखी ३८५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.

एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला की त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेतला जातो. आतापर्यंत मुंबईत १७५३ रुग्ण सापडले असून त्यापैकी ७८१ रुग्ण हे अशा संपर्कातील आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग काही प्रमाणात टळला आहे. मंगळवारी मृत पावलेल्या ११ जणांमध्ये ३ महिला असून ८ पुरुष आहेत. यामध्ये सगळ्यात कमी वय असलेल्या ३६ वर्षांच्या पुरुषाचा समावेश असून त्याला दमा होता. नऊ जणांना मधुमेह, हृदयविकार, दमा असे आजार होते, तर दोन जणांना कोणताही आजार नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button