breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात २१०० नवे कोरोना रुग्ण, संख्येने ओलांडला ३७ हजारांचा टप्पा

महाराष्ट्रात आज २१०० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही ३७ हजार १५८ झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र हे असताना आज समाधानाची बाब ही की राज्यभरात आज १२०२ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची ही सर्वात मोठी संख्या आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. आत्तापर्यंत ९ हजार ६३९ जणांना राज्यात डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button