Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात ११६५ नवे कोरोना रुग्ण, ४८ मृत्यू, संख्या २० हजार २०० च्या वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/rajesh-tope-1.jpg)
महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना रुग्णांची संख्या २० हजार २२८ इतकी झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.