breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात नवे २०२३ कोरोना रुग्ण, ५१ मृत्यू, संख्येने ओलांडला ३५ हजारांचा टप्पा
महाराष्ट्रात आज २०३३ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज राज्यात ७४९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातल्या आत्तापर्यंत ८ हजार ४३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत अशी माहितीही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर आज राज्यात आज ५१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असंही समजतं आहे. राज्याच्या करोना ग्रस्तांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.