Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात एकाच दिवसात कोरोनाचे 5024 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 52,765, मृत्यू 7,106
![# Covid-19: State's recovery rate 95.64 percent! 5 thousand 890 patients tax free in a day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Coronam-7-2-1.jpg)
मुंबई: राज्यात शुक्रवारी कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. दिवसभरात तब्बल ५०२४ रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा तब्बल १ लाख ५२,७६५ वर गेलेला आहे.
शुक्रवारी १७५ मृतांसह बळींचा एकूण आकडाही ७,१०६ वर गेला आहे. नव्या मृत्यूंपैकी ९१ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील, तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. शुक्रवारी २,३६२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा ७९,८१५ वर गेला आहे