CoronaVirus : महाराष्ट्रात उद्यापासून “Lockdown”, मुख्यमंत्र्यांचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ES2CRwHU8AAP7mo.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. आपल्याला या संकटावर मात करायची आहे. उद्या सकाळपासून महाराष्ट्रभर कलम 144 लागू करणार,’ अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे उद्या (सोमवार) सकाळपासून महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे ठळक मुद्द
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन
शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा
फक्त 5 टक्के कर्मचारी बाहेर काम करतील. 5 टक्के कर्मचारी संपूर्ण राज्याचा भार वाहतील
किमान पुढच्या 31 मार्चपर्यंत या नियमांचं पालन करा
जनता कर्फ्यू उद्या पहाटेपर्यंत राहणार
31 मार्चपर्यंत खासगी बस, एसटी, रेल्वे बंद राहणार
बस सेवा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू
या रोगाने कोणाचाही माग सोडला नाही. सगळ्या देशाला या रोगाने वेढलं आहे.
त्यामुळे कोणी माणूसकी सोडू नका
पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नका
अन्नसाठा आणि महत्त्वाची दुकानं उघडी राहतील. त्यामुळे घरात साठा करून ठेवण्याची गरज नाही
घरकामांना किमान वेतन सुरू ठेवा
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत
सगळ्यांनी एकत्र येत सामना करूया
कंपन्यांनी कामगारांना किमान वेतन द्दावं
या रोगाने कोणाचाही माग सोडला नाही. सगळ्या देशाला या रोगाने वेढलं आहे.
त्यामुळे कोणी माणूसकी सोडू नका
मुंबई लोकल पूर्णपणे बंद