breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus : मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द
मुंबई | कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आणि गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त असल्याने मध्य रेल्वेने खबरदारी घेतली असून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेने मुंबईत लोकल रेल्वेची स्वच्छता हाती घेतली आहे. रेल्वे अधिक कशी जंतुनाशक राहिल यावर भर देण्यात आला आहे.
आता तर मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या १७ ते३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.