Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
CoronaVirus: भारतात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढला; देशभरात 396 कोरोनाग्रस्त तर 7 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-new-3-1.jpg)
नवी दिल्ली |महाईन्यूज
कोरोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 396 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील सुरत येथे एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याआधी बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.