breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांना संसर्ग

बुलडाणा जिल्ह्यातील आणखी दोघांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज, बुधवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३२ झाली. जिल्ह्यातील ४८ नमुन्यांचे अहवाल आज नकारात्मक आले. बुलडाणा जिल्ह्यातील नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ५० नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ४८ अहवाल नकारात्मक व दोन अहवाल सकारात्मक आले आहेत.

आज सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शेगाव येथील ३२ वर्षीय महिला व मोताळा तालुक्यातील आव्हा येथील २२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. शेगाव येथील पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला रविवारी करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज त्याच्या पत्नीचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला. मोताळा तालुक्यातील करोनाबाधित तरुण मुंबईवरून १५ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २४ करोनाबाधित रुग्णांचा फेरतपासणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. करोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २४ आहे. सध्या रुग्णालयात पाच करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आणखी ९० नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७९६ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button