breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus | बारामतीत आणखी एक सापडला कोरोनाचा रुग्ण

पुणे | जिल्ह्यातील बारामतीत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. काल पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे बारामतीत कोरोना बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. शहरात मेडिकल विक्रेत्याच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव होत असल्याने बारामती शहरात लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक असणारी प्रत्येक वाहने पोलीस तपासत आहेत. त्यानंतर या वाहनांना पुढे सोडण्यात येत आहे.

तर ठिकठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून घराबाहेर पडणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. विनाकारण कारण बाहेर फिरणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button